श्री पंचम खेमराज महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा बुधवारी 12 रोजी
सावंतवाडी
श्री पंचम खेमराज महाविद्यालया मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची उच्च शिक्षणातील अंमलबजावणी या संदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. रवींद्र कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील शाखानिहाय श्रेयांक पडताळणी या कार्यशाळेमध्ये केली जाणार आहे. यासाठी प्राचार्य डॉ. बांबर्डेकर, कॉमर्स अधिष्ठाता वाणिज्य विभाग, प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक,अधिष्ठाता कला शाखा, डॉ.प्रवीण सिनकर, डेटा अनालिस्ट मुंबई विद्यापीठ हे मार्गदर्शन करणार आहेत.याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य,अंतर्गत गुणवत्ता समन्वय कक्षाचे समन्वयक,परीक्षा विभाग प्रमुख,एन ई पी समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यशाळेसाठी विद्यार्थी पालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांनी केले आहे.
