You are currently viewing अचानक आग लागल्यामुळे सावंतवाडीत गरड येथे कंटेनर जळून खाक…

अचानक आग लागल्यामुळे सावंतवाडीत गरड येथे कंटेनर जळून खाक…

 

गाडीसह कपडे असे मिळून तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान…

सावंतवाडी

उभ्या असलेल्या कंटेनरला आग लागून गाडीसह आत भरलेले कपड्याचे कर्टन असे मिळून तब्बल तीस ते पस्तीस लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. हा प्रकार रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास माजगाव-गरड येथे घडला परिसरात. राहणाऱ्या नागरीकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला,परंतू आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे त्यांचे प्रयत्न फसले. याबाबतची माहिती शिवसेनेचे उपशहर प्रमुख विशाल सावंत यांनी दिली. नेमकी आग कशी लागली?, याबाबत माहिती कळू शकली नाही. या गाडीत कपड्याचे कर्टन होते. गाडी मालक मोहम्मद हसन शफी शेख यांनी गोव्यातून मुंबईकडे नेण्यासाठी हा माल आणला होता. रात्री ते घरी थांबले होते. आगीत गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे.ही आग आटोक्यात आणण्यासाठी विशाल सावंत यांच्यासह वीज मंडळाचे अधिकारी महेश गोंधळेकर, अर्जुन नाईक, मोसिन शेख,नेल्सन फेराव आदींनी प्रयत्न केले.पालिकेचा बंब बोलविण्यात आला.परंतु बंब दाखल होवून सुध्दा गाडीत असलेल्या कपड्यांनी पेट घेतल्याने प्रयत्न फसले

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =