You are currently viewing नववधू ..हिरव्या चुड्यात..!

नववधू ..हिरव्या चुड्यात..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नववधू ..हिरव्या चुड्यात..!!*

 

तशी मी कुणाचीच

वाट बघत नाही

पण तिची वाट

मला बघावीच लागते

ती मला ओळखत नाही ……..!!

दूरच ती थांबते

अंग चोरून उभी असते

नजरा नजर होताच

ती कावरी बावरी होते ..

 

तिच्या काळजाचे ठोके

मी जवळून ऐकतो

चोरून चोरून बघतो

निळ्या पदरांत दडलेला

हिरव्या चुड्याचा तिचा हात

हातांत घेवू कां ?

नकोच! अजून तिच्या हातावरची

मेंदी ताजी वाटते ….!!

 

चुकतंय! कुणाच्या नव्या नवरीला

स्वतः च्या प्रेयसी सारखं बघणं

चुकीचचं! जरी आपलं काळीज

थबकलं !तरी ती माझी नाही

नव्या को-या शालूचा गंध घेत

माझ्या उरावरून तिची वरात

पुढून ..आहे जात…………

रंगीत तांदूळ मी तिच्यावर

उधळणार नाही..तिच्या वरातीत

मी मुळीचं नाचणार नाही

सोहळा उरकण्याची वाट बघणार

ती नववधू आहे ..ती माझी नाही

ती माझी.. कविता नाही…!!!!!

 

रेंगाळते..ती..कैक दिवस मनांवर

घालत राहतो..फुंकर चटक्यांवर

असंख्य वेणा सोसायच्या तरी किती

स्वप्नांत गातांना कधी हरवतात सूर

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा