You are currently viewing सुलभा ताई दोंदे 73व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ….

सुलभा ताई दोंदे 73व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ….

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेत्या, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वरीष्ठ उपाध्यक्ष, तसेच वुमन नेटवर्क च्या चेअरपर्सन, सार्क टिचर फेडरेशनच्या कोषाध्यक्ष आदरणीय स्वर्गीय सुलभाताई दोंदे यांची आज ८ मार्च रोजी जयंती……

आंतरराष्ट्रीय महिलादिन व सुलभाताई यांचा जन्मदिन एकाच दिवशी.. हा नुसता योगायोगच नव्हता तर हजारो महिला आज शिक्षकांच्या चळवळीत ताईंच्या प्रेरणेने विविध पदे भुषवतात…. जो काळ संघटनेत चार दोन महिला भगीनी सक्रिय काम करत अशा काळात ताईंनी संघटन चळवळीत कामास सुरुवात केली.
एक अतिशय अभ्यासू, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे व सर्वसामान्य शिक्षकाला अतिशय सन्मान व प्रेम देणा-या ताई म्हणून त्या केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरातील शिक्षकांच्या ताई झाल्या…
त्याग करीत राहिले की जीवनास मोल प्राप्त होते ही दोंदे घराण्याची शिकवण ताईंच्या अ़ंगवळणी पडली होती…
स्वतःची लढाई लढून त्यांनी स्वतः चं अस्तित्व तयार केलं होतं ….म्हणून पदं त्यांना कर्तृत्वावर मिळत गेली….आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय संघटनेत त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते….
भाई साहेबाच्या निधनानंतर आभाळभर दु:खातून त्या तितक्याच हिमतीने उभ्या राहिल्या …कधी शौर्याची ढाल कधी उबदार शाल बनून शिक्षकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या…..
अतिशय हळव्या , तितक्याच प्रेमळ, प्रसंगी तितक्याच कठोर अशा वेगवेगळ्या स्वभाव छटा त्याच्या व्यक्तीमत्वात होत्या म्हणून प्रत्येकाच्या मनात एक आदरयुक्त दरारा त्याच्या विषयी नेहमीच राहिला.आचार्य दादासाहेब दोंदे यांनी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ स्थापन करून शिक्षकांचे समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहिले.त्यांचे सुपुत्र अरूण दोंदे व सूनबाई आदरणीय सुलभा ताई दोंदे यांनी ही संघटना जागतिक पातळीवर पोहोचवली. सुलभा ताई अरूण दोंदे उत्तम शिक्षिका होत्या.

आज त्याच्या जयंतीनिमित्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग व तमाम संघ सैनिकांकडूनविनम्र अभिवादन …
तसेच जागतिक महिलादिनाच्या माझ्या अखिल परिवारातील सर्व माता बहिणींना हार्दिक शुभेच्छा….💐💐💐

शुभेच्छुक – श्री . के . टी. चव्हाण . जिल्हाध्यक्ष
श्री . गुरुदास कुबल जिल्हा सरचिटणीस
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संध सिंधुदुर्ग आणि अखिल परिवार .

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 4 =