You are currently viewing लोकसंख्या नियंत्रणाकरिता प्रबोधनाची गरज

लोकसंख्या नियंत्रणाकरिता प्रबोधनाची गरज

लोकसंख्या नियंत्रणाकरिता प्रबोधनाची गरज
डॉ.के.आर. चव्हाण

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावणाने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने दि. ११ जुलै “जागतिक लोकसंख्या दिन” कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.माणिक चौगुले, प्रमुख वक्ते डॉ. किरण पाटील, स्टाफ सचिव प्रा.सुरेश पाटील, IQAC प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर सिरसट व विभाग प्रमुख डॉ.रमेश गुलदे उपस्थित होते.
प्रमुख वक्ते डॉ. किरण पाटील यांनी ‘लाइफ एक्स्पेक्टन्सी‘ (सरासरी आयुर्मान) या विषयावर मार्गदर्शन केले.
गेल्या काही दशकांत अन्न, निवारा, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा विस्तार झाल्याने नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. शिक्षणाचा प्रसार, विशेषतः महिलांमधील शिक्षणामुळे कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता वाढली असून योग्य विवाहवय, मातृत्वाचे नियोजन आणि लहान कुटुंबाची संकल्पना समाजात अधिक दृढ होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रे, लसीकरण, औषधोपचार आणि जनजागृतीमुळे मृत्यूदरात घट झाली असून ग्रामीण भागातही आरोग्य सुविधा पोहोचल्याने सरासरी आयुर्मानात लक्षणीय वाढ झाली आहे. मूलभूत गरजांची उपलब्धता, शिक्षण, आरोग्य सेवा आणि विकसित
तंत्रज्ञान आयुर्मानवाढीची प्रमुख कारणे आहेत असे डॉ.किरण पाटील यांनी सांगितले. लोकसंख्या नियंत्रणाकरिता समाज प्रबोधनाची गरज आहे. काही देशांमध्ये लोकसंख्या फार वेगाने वाढत आहे तर काही देशांमध्ये लोकसंख्येचा दर कमी होत आहे. गावेच्या गावी ओसाड पडलेली आहेत तर भारत आणि इतर देशांमध्ये लोकसंख्येची घनता फार वेगाने वाढत आहे. आपल्या देशात जगातील सर्वात जास्त युवकांची संख्या आहे त्यामुळे त्यांना शिक्षण प्रशिक्षण याबरोबर औद्योगिक प्रगती होणे गरजेचे आहे. त्यांना रोजगार मिळाला पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश गुलदे यांनी तर आभार प्रा. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सत्यजीत राजे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा