You are currently viewing स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम

स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी

स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिना निमित्त 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9 वाजून 5मिनीटांनी पोलिस परेड ग्राऊंड, जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास के.मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर मान्यवर, अधिकारी /कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

सकाळी 9.05 वाजता मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, सकाळी 9.05. ते 9.15 वा. पर्यंत पोलिस दल, राज्य राखीव दल व होमगार्ड यांची संयुक्त मानवंदना असा कार्यक्रम होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा