कुडाळ माड्याची वाडी येथे डंपरच्या धडकेने गायीचा मृत्यू

कुडाळ माड्याची वाडी येथे डंपरच्या धडकेने गायीचा मृत्यू

 

कुडाळमध्ये माड्याची वाडी येथे पाट – परुळे मार्गावर वाळू वाहतूक करणारे डंपरने गाईला धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. याबाबत सरपंच सचिन गावडे यांनी तहसीलदारांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. तर बेदरकारपणे डंपर चालण्यावर बंदी आणावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात मृत्यू पडलेली गाय सिताराम पाटकर यांची असून त्यांचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे. विग्नेश  गावडे, रुपेश गावडे, संभाजी गावडे, शरद पाटकर, आनंद गडकरी, बापू कोरगावकर, हरेश वारंग, चेतन गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा