You are currently viewing विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम’ पाचवे पर्व उद्या; वेंगुर्ल्यात प्रेरणादायी शैक्षणिक सोहळा

विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम’ पाचवे पर्व उद्या; वेंगुर्ल्यात प्रेरणादायी शैक्षणिक सोहळा

‘विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम’ पाचवे पर्व उद्या; वेंगुर्ल्यात प्रेरणादायी शैक्षणिक सोहळा

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक व निवृत्त शिक्षकांचा सन्मान; ‘विद्यार्थी आकस्मिक निधी’ उपक्रमाचेही अनावरण

वेंगुर्ला

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम’ या अभिनव उपक्रमाच्या पाचव्या पर्वाचा सोहळा शनिवार, १८ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने लोकसहभागातून हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव असतील. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह शिक्षण, प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच निवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा आणि नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा गौरवही करण्यात येईल. याचबरोबर ‘विद्यार्थी आकस्मिक निधी’ या नव्या उपक्रमाचाही परिचय उपस्थितांना करून दिला जाणार आहे.
‘एक विद्यार्थी दत्तक, एक भविष्य उज्ज्वल’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या या शैक्षणिक लोकचळवळीला बळ देण्यासाठी पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा