You are currently viewing परमे येथील युवकाचे अल्पशा आजाराने निधन

परमे येथील युवकाचे अल्पशा आजाराने निधन

*परमे येथील युवकाचे अल्पशा आजाराने निधन*

शिवाजी लक्ष्मण जाधव यांच्यावर बांबोळी (गोवा) येथे उपचार सुरू असताना निधन; गावात शोककळा

*साटेली भेडशी, प्रतिनिधी :*

परमे येथील शिवाजी लक्ष्मण जाधव (वय ३५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी गोव्यातील बांबोळी येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने परमे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवाजी जाधव हे गेल्या महिनाभरापासून आजारी होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी विविध ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवाजी जाधव हे मनमिळाऊ, शांत स्वभावाचे आणि मित्रपरिवार तसेच नातेवाईकांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होणारे युवक म्हणून परिचित होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे गावात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण, काका-काकी, चुलत भाऊ तसेच अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा