You are currently viewing शिरोडा-वेळागर समुद्रात दोघे बुडाले, एकाचा मृत्यू…

शिरोडा-वेळागर समुद्रात दोघे बुडाले, एकाचा मृत्यू…

दोघे सावंतवाडीतील कामगार; दुसऱ्याचा शोध सुरू,

वेंगुर्ले

शिरोडा येथील समुद्रावर मौजमजा करण्यासाठी गेलेले दोघे कामगार बुडाले आहेत. त्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ही घटना आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास वेळागर परिसरात घडली. याबाबत वेंगुर्ल्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दुजोरा दिला आहे. संबंधित कामगार हे सावंतवाडी शहरात एका फरशीच्या दुकानात कामाला असल्याचे समजते. याबाबतची माहिती मनसेचे वेंगुल्याचे तालुका सचिव आबा चिपकर यांनी दिली. त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे. स्थानिक स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून समुद्रात बेपत्ता झालेल्याचा शोध सुरू आहे. वाचविण्यात आलेल्या दुसऱ्या युवकाला बाहेर काढण्यास यश आले. परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे दोघेही सावंतवाडीतील एका फरशीच्या दुकानात कामाला होते. ते राजस्थान येथील आहेत. आज दसऱ्याची सुट्टी असल्यामुळे ते मौजमजा करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसमवेत समुद्रावर गेले होते. यावेळी हा प्रकार घडला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघेही पाण्यात गेले. मात्र त्या ठिकाणी एक बेपत्ता झाला, तर दुसऱ्याला वाचवण्याचे यश आले, परंतु बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 10 =