You are currently viewing बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ तारखेपासून कोविड लसीकरण

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ तारखेपासून कोविड लसीकरण

जगदीश पाटील यांची माहीती ; ६० वर्षांवरील नागरिकांना मिळणार लाभ….

बांदा
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० वर्षावरील व्यक्तींना कोविड-१९ लसीकरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ सोमवार दिनांक ८ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.
शहरातील सटमटवाडीसाठी सोमवार दिनांक ८ मार्च, देऊळवाडीसाठी बुधवार दिनांक १० मार्च, उभाबाजार व रामनगरसाठी शुक्रवार दिनांक १२ मार्च, पोलीस लाईन व मोर्येवाडीसाठी सोमवार दिनांक १५ मार्च, बाजारआळी व मुस्लिमवाडीसाठी बुधवार दिनांक १७ मार्च, काळसेवाडीसाठी शुक्रवार दिनांक १९ रोजी लसीकरण करण्यात येणार आहे.
हे लसीकरण ६० वर्षांवरील व्यक्तींना व ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार करण्यात येणार आहे. सोबत येताना आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळ्खपत्राचा पुरावा घेऊन येण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 8 =