*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सामाजिक कार्यकर्ता रणरागिणी संगीता बढे लिखित अप्रतिम लेख*
*जागतिक विधवा दिवसाच्या अनुषंगाने……..*
२३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून साजरा केल्या जातो,पण विधवांसाठी पण एक जागतिक स्तरावरचा एक दिवस असतो अजूनही याची कल्पना बऱ्याच जणांना नाही.
गेली दोन वर्षे झाली आम्ही एकल महिलांना घेऊन हा दिवस साजरा करतो.
पतीच्या निधनानंतर त्या विधवा महिलांसोबत समाजात कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये, त्यांना त्यांच्या पतीच्या मृत्यूसाठी दोषी मानू नये,कोणी त्यांच्याशी गैरवर्तणूक करू नये,त्यांना सुद्धा समान तत्वावर काम करण्याची संधी देऊन त्यांचा पगार ही हा समान तत्वावरच देण्यात यावा,हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
जो समाज ८ मार्चला जागतिक महिला दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो तोच जागतिक विधवा दिवस साजरा करायचं विसरतो.विधवा या सुद्धा महिलाच आहेत हे त्यांच्या लक्षात कस येत नाही? समाजाला
जागतिक विधवा दिवसाचा कसा काय विसर पडू शकतो ?
कारण बहुतेक लोकांना विधवांसाठी जागतिक असा एक दिवस आहे याची साधी कल्पना सुद्धा नाही आहे.ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
याच पार्श्वभूमीवर अशा अनेक प्रश्नांना घेऊन विधवा आणि त्यांच्या समस्येवर लिहिण्यात आलेला एक छोटासा लेख.
२३ जून २००६ मध्ये लुंबा फाउंडेशन चे संस्थापक राज लुंबा यांनी या दिवसाची सुरुवात केली. २३ जून हा दिवस त्यांच्या आईच्या विधवा होण्याचा दिवस. त्यानंतर २०१० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून पाळण्यास सुरुवात केली.
पतीच्या निधनानंतर समाजाच्या त्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.प्रत्येक समाजात पुरुषाचा दर्जा हा त्याच्या सामाजिक प्रतिष्ठा आणि त्याच्या आर्थिक स्थिती वर ठरत असतो,त्याच समाजात स्त्रीचा दर्जा हा तिच्या वैवाहिक स्थितीवरून ठरत असतो.पती नसलेल्या महिलेचा दर्जा हा समाजामध्ये दुय्यम असतो.
आजही हीच स्थिती आहे.समाजाचा विधवा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा दूषितच आहे. अंधश्रद्धेच जबरदस्त जोखड त्याच्या मनावर आहे. याच अंधश्रद्धेतून तो विधवा स्त्रीला पांढऱ्या पायाची,अवदसा,अपशकुनी,नवऱ्याला मारणारी,नवऱ्याला खाणारी अशाच नावाने संबोधतो. या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा तिच्या मनावर परिणाम होऊन ती मनो – सामाजिकरित्या खचून जाते. स्वतःचा आत्मविश्वास ती गमावते आणि यातूनच कधी कधी ती मुलाबाळांना घेऊन आत्महत्या सुद्धा करते.
भारतातून सतीची प्रथा,केशवपन प्रथा पूर्णपणे बंद झाल्या असल्या तरीही विधवांना अजूनही समाज स्वीकारताना दिसत नाही , मुख्य करून ग्रामीण भागात अजूनही विधवांना अपशकुनीच मानल्या जाते. पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीच्या हातातील बांगड्या फोडणे, तिच्या कपाळावरील कुंकू मोडणे,पायाच्या बोटातले जोडवी काढून घेणे,तिचे सगळे सौभाग्य अलंकार उतरवणे,तिच्या राहणीमानावर बंधन घालणे,तिचा पेहराव,तिचे आचार,विचार यावरसुद्धा अलिखित बंधन लादली जातात.संपूर्ण कुटुंबासाठी ती एक ओझ मानल्या जाते. तिच्या पतीचा मृत्यू हा कुठल्याही कारणाने झाला असला तरीही त्याला दोषी तिलाच मानल्या जाते.त्याचा सगळा दोष तिच्या माथ्यावर मारल्या जातो.
पतीच्या निधनानंतर विधवा ज्या परिस्थितीत आपले जीवन जगतात ते कुठल्या अग्निकुंडात जळून खाक होण्यापेक्षा काही कमी नाही.
जोडीदाराच्या मृत्यूने आधीच मानसिकरित्या खचलेल्या त्या महिलेला कुटुंबात दुय्यम दर्जाची वागणूक मिळते.समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही बदलतो,लोकांच्या बरबडलेल्या नजरांचा तिला सामना करावा लागतो.तिला अपशकुनी मानून तिच्यासोबतच तिच्या मुलांचाही छळ केल्या जातो.इतर स्त्रिया आणि विधवा यांच्यामध्ये भेदभाव केल्या जातो, या सगळ्या गोष्टींमुळे विधवा महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
विधवा झालेल्या स्त्रीने कुंकू का लावू नये ? तिने धार्मिक कार्यात सहभागी का होऊ नये? विधवा स्त्री ही विधवाच दिसावी तिने तसेच रहावे असा अट्टाहास समाज का करतो ? पत्नीच्या मृत्यूनंतर पुरुषाला अशी कुठलीच बंधने नाहीत स्त्रीलाच का ? का तिला दुबळी बनवण्याचा पर्यंत केल्या जातो ? तिच्या नावासमोर श्रीमती/ गं.भा. लावण्याचा शासन का प्रयत्न करते? का?
आपल्या संस्कृतीमध्ये कपाळावर कुंकवाचा टिळा लावणं हे अत्यंत आदराचे, मानाचे लक्षण समजल्या जाते.कपाळावर कुंकवाचा टिळा लावल्याने आपल्यातील ऊर्जेचे संतुलन राखण्यास मदत होते,आपली भावनिक स्थिरता टिकवून ठेवण्यास मदत होते,आपले मन शांत राहून आपल्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.कपाळावर कुंकवाचा टिळा लावल्याने आपले आरोग्य चांगले राहते हे जर खरं आहे तर कपाळावर कुंकू लावण्याची सर्वात जास्त गरज ही विधवांना नाही का?
तसेच हिंदू कायद्यामध्ये विधवांना अनेक प्रकारचे अधिकार असूनही विधवा महिलांचा एक मोठा हिस्सा अजूनही त्या अधिकाराबद्दल अज्ञानी आहे.मालमत्ता,वारसा,सह – सौभाग्य इत्यादी बद्दल अजूनही त्या अंधारातच आहे.आजही अशा अनेक विधवा महिला आहेत ज्यांना त्यांचा पालनपोषणाचा अधिकार,मालमत्ता अधिकार याविषयी माहिती नाही.याच अज्ञानामुळे त्यांना त्यांच्या व मुलांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यामध्ये अडचणी येतात. सध्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहे.
जसे : हिंदू महिला संपत्तीचा अधिकार कायदा १९३७
हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा २००५
हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६
सरकारने असे अनेक कायदे विधवांसाठी केले असले तरीही प्रत्यक्षात मात्र विधवांमध्ये या कायद्याविषयी पाहिजे तितकी जागरूकता दिसून येत नाही.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार भारतामध्ये सध्या ४६ दशलक्ष विधवा महिला आहेत आणि हा आकडा जगामध्ये सगळ्यात वरचा आहे,त्यानंतर चीन आहे.
आजही अनेक विधवा स्वतःच्या मूलभूत अधिकारांसाठी,जीवनावश्यक गरजांसाठी,समाजामध्ये समान संधी मिळवण्यासाठी सतत संघर्ष करत आहे. आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विधवा या पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे.अनेकांना राहण्याची सोय नसल्याने त्या रस्त्यावर,रेल्वे स्थानकावर,बस स्थानकावर राहत असल्याने त्या स्वतःच्या शरीराची पाहिजे तशी काळजी घेऊ शकत नाही.मासिक पाळी विषयी जागरूक नसल्याने इन्फेक्शन ची समस्या निर्माण होते.यातूनच त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
या सगळ्या अभ्यासातून एकच निष्कर्ष निघतो आणि तो म्हणजे विधवा महिलांना संरक्षण देण्यासाठी,त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी समाजातील प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक तरुणाला आधी संघटित होणे गरजेचे आहे, आणि याची सुरुवात ही आपल्या घरापासून करणे अत्यंत आवश्यक आहे.घरापासूनच तिला सहकार्य केले पाहिजे,धार्मिक कार्यात तिला सहभागी करून घेतले पाहिजे तरच तिच्यातील आत्मविश्वास वाढेल.
देशाचा विकास आणि महिलांचा विकास यांचा प्रत्यक्षात संबंध आहे.
विधवा महिलांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे.
यात सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे समाजाची विधवांकडे बघण्याची मानसिकता बदलणे. संपूर्ण जगात ८ मार्च जागतिक महिला दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो,पण विधवा महिला सुद्धा त्याच महिला गटाचा हिस्सा आहे हे मात्र समाज विसरतो. एक माणूस म्हणून तिलाही जगण्याचा अधिकार आहे.सामाजिक दृष्ट्या विधवांची जी उपेक्षा केली जाते ती कुठेतरी थांबली पाहिजे.विधवांचे संरक्षण आणि संवर्धन हा तिच्या सन्मानाचा मुद्दा आहे,हा बदल जेव्हा समाजात घडून येईल तेव्हाच आंतरराष्ट्रीय विधवा दिवस खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
२०२६ च्या आंतरराष्ट्रीय विधवा दिवसाची संकल्पना ही *न्याय, गरिमा आणि आर्थिक शक्ति” (Justice, Dignity, and Economic Power*) आहे.
या दिवसाचे अंतिम ध्येय हे असे काही धोरणे व संसाधने तयार करणे आहे की ज्यामुळे विधवा या सक्षम बनतील.त्यांना शिक्षण,रोजगार,आरोग्य सेवा सोबतच त्यांच्यावरील हिंसा व अत्याचारापासून मुक्ती प्रदान करेल, आणि त्या पतीच्या निधनानंतर ही स्वतः व मुलांसोबत एका नवीन जीवनाला सुरुवात करू शकेल.
पण एक आंतरराष्ट्रीय दिवस हा स्वतः एकटा हा बदल दूर करू शकत नाही त्यासाठी आपल्याला आधी संघटित व्हावं लागेल. जागतिक विधवा दिवस हा केवळ एक उत्सव न राहता तो प्रत्येक विधवा महिलेसाठी एक संधी बनला पाहिजे.
आपणही थोडा थांबून ,विचार करायला पाहिजे की आपल्याला काय मिळाले? आणि काय मिळायचे बाकी आहे?
लेखिका/सामाजिक कार्यकर्ता
रणरागिणी संगीता बढे
वर्धा
९७६४४९६७३२
_________________________
*संवाद मीडिया*
🌟 *विशेष धार्मिक व पर्यटन सहल पॅकेजेस* 🌟
🙏 कुटुंबासोबत आध्यात्मिक आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव घ्या!
🚆 *तिरुपती बालाजी दर्शन*
📍 प्रस्थान: कल्याण / लोकमान्य टिळक टर्मिनस / मुंबई
📅 दररोज
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹8,850/- पासून
🚆 *प्रयागराज – वाराणसी यात्रा*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,099/-
🚆 *प्रयागराज – अयोध्या यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,399/-
🚆 *हैदराबाद व रामोजी फिल्म सिटी*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,975/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,199/-
🚆 *शिर्डी – छत्रपती संभाजीनगर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,499/-
🚆 *हैदराबाद – श्रीशैलम यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹15,575/-
🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर – नाशिक*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹14,050/-
🚆 *स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया)*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹10,000/-
✈️ *श्रावण विशेष – रामेश्वरम व मदुराई*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 31 जुलै 2026
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹26,000/-
✈️ *हैदराबाद – श्रीशैलम विमान प्रवास*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 13 ऑगस्ट 2026 व 03 सप्टेंबर 2026
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹27,500/-
*सहल खर्चात समाविष्ट* ——
✅ रेल्वे तिकीट*
✅ हॉटेल निवास
✅ भोजन व्यवस्था*
✅ पर्यटन स्थळांची भेट व स्थानिक प्रवास
✅ टूर गाईड
*अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क करा:*
*📞 7350 7350 91*
*7350 534 534*
✨ *मर्यादित जागा उपलब्ध – आजच आपली सीट निश्चित करा!* ✨
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/206067/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
