स्टँडिंग फॅन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; वैभववाडी भाजप युवा मोर्चाच्या वतीने सामाजिक उपक्रम
वैभववाडी :
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा वैभववाडीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत नांदगाव (असलदे) येथील द्विविजा वृद्धाश्रमाला आवश्यक स्टँडिंग फॅन तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल सरवटे, शहराध्यक्ष आशीष रावराणे, सरचिटणीस सत्यजित रावराणे, उपाध्यक्ष रमेश शेळके, गुरुराज डोंगरे, समाधान गुरव, श्रेयस नेवरकर, सुशांत कोलते, उदय रावराणे तसेच स्वस्तिक फाऊंडेशनचे सचिव संदेश शेट्ये उपस्थित होते.
