You are currently viewing उद्या सावंतवाडीत ठाकरे पक्षाचा शिवगर्जना मेळावा

उद्या सावंतवाडीत ठाकरे पक्षाचा शिवगर्जना मेळावा

सावंतवाडी :

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवगर्जना मेळावा उद्या होणार आहे. सावंतवाडी येथील आदिनारायण कार्यालयात हा मेळावा सायंकाळी पाच वाजता होणार आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, उपनेते मीना कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सर्व पदाधिकारी, उपतालुकाप्रमुख, उपतालुका संघटक, विभागप्रमुख, विभाग संघटक, उपविभाग प्रमुख, सर्व शाखाप्रमुख, बूथप्रमुख, सरपंच सर्व उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, सर्व महिला आघाडी, युवासेना, सर्व सेल्सच्या पदाधिकारी, सर्व आजी, माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रुपेश राऊळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा