You are currently viewing गणेश कॅश्यू फॅक्टरीत कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण
Oplus_16908288

गणेश कॅश्यू फॅक्टरीत कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण

काजू प्रक्रिया ते उद्योग व्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती

मालवण / चौके: छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किलॉस-ओरोस येथील विद्यार्थ्यांनी मसदे, विरण येथील गणेश कॅश्यू फॅक्टरी येथे एक महिन्याचा इंडस्ट्रियल अटॅचमेंट कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. या कालावधीत विद्यार्थ्यांनी काजू प्रक्रिया, वाळवणी, वर्गीकरण, पॅकिंग, गुणवत्ता नियंत्रण तसेच उद्योग व्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती घेतली.

फॅक्टरीचे मालक सुरेश नेरूरकर व गणेश नेरूरकर यांनी विद्यार्थ्यांना काजू उद्योगातील विविध प्रक्रिया, यंत्रसामग्री, उत्पादन खर्च आणि व्यवसाय व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्राचार्य डॉ. एस. एस. भेंडे, उपप्राचार्य लेफ्टनंट व्ही. व्ही. राणे, कार्यक्रम प्रभारी प्रा. डी. एम. खरात तसेच कृषी विस्तार विभागाचे प्रा. जी. डी. गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात शांताराम अनिल गावडे, तनमय नंदकुमार बोडेकर, चंद्रदीप ज्ञानदेव चव्हाण, यश संतोष बुलबुले, दिग्विजय विष्णू मोरे, गणेश देविदास मासाळ व विशाल पोपट देशमुख या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांसाठी हा औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरल्याची भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा