You are currently viewing मनसे पदाधिकाऱ्यांकडून कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावलेंचे स्वागत

मनसे पदाधिकाऱ्यांकडून कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावलेंचे स्वागत

कुडाळ

कुडाळ पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र हुलावले यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यात मोठ्या आस्थेने, भक्तिभावाने व निष्ठापूर्वक साजरा होणाऱ्या गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाने अविरत व प्रामाणिकपणे कार्यरत राहून कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था अतिशय उत्कृष्टपणे हाताळल्याबद्दल सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनसे पदाधिकाऱ्यांनी तोंडभरून कौतुकही केले.

यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, माजी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, सचिन ठाकूर आदि पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा