*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा समूह प्रमुख लेखक कवी श्री पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*==साहित्य आणि साहित्यिक ==*
आपण साहित्यिक, कवी, लेखक, कलावंत. ही आपली जातकुळी . आपण व्यक्त होणारी माणसं. जो व्यक्त होतो तो व्यक्ती. आपण आपल्याच नव्हे तर सर्व समाजाच्या भावना, वेदना, दुःखे, जाणीवा,आकांक्षा यांना आपल्या साहित्याच्या माध्यमातून वाट मोकळी करून देतो. आपण छानपणे व्यक्त होतो म्हणून आपण चांगले व्यक्ती असतो. ते आपले कर्म, कर्तव्य आहे. ते निसर्गात: घडून येते म्हणून आपण साहित्यिक.
समाज प्रबोधन हा आपल्या कार्याचा गाभा असला पाहिजे. साहित्य हे माध्यम आहे साधन आहे. त्याची साधना करून आपण जनतेसाठी त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केल पाहिजे.
रामायण विचारसरणी , महाभारत विचारसरणी आणि वर्तमान विचारसरणी हे तीन प्रवाह.
रामायण… आदर्श समाज आदर्श राजा आदर्श मित्र, भाऊ वडील, मुलगा, पती, पत्नी, सखा,सेवक इत्यादी
महाभारत… भाऊबंधकी, क्लेश, उदासीनता, द्वेष, कटुता, वाईट विचार यांनी ग्रस्त समाज
वर्तमान समाज… विकृती, दहशतवाद, मुस्कटबाजी, खून, अत्याचार, फसवाफसवी, ढोंगीपणा, आतताईपणा, स्वार्थी वृत्ती. सर्व टोकाचे. यांना प्रतिष्ठा मिळाली
आपला साहित्यिकांचा प्रवास हा जबाबदारीचा प्रवास आहे. उदात्त अश्या अभिजात साहित्यिकांचे उत्तरदायित्व आपणास निभावायचे आहे. त्यासाठी आपण कस असायला पाहिजे? आपण दक्ष, रक्षक असायला हवे. मानसिक, भावानिक आणि वास्तव स्तरावर अपल्याला काम करायचे आहे. लिखाण, काव्य, कथा, नाटक, कला यांच्यामार्फत आपणाला समाज जागृती जरायची आहे. समजप्रबोधन करायचं आहे. क्रांती घडऊन आणायची आहे. व्यक्तित्व विकास साधायचा आहे.
फक्त टाळ्या धारी, वर्णननात्मक लिखाण साहित्य आता आपल्याला नको आहे. मनोरंजन म्हणून ते काही प्रमाणात ठीक आहे पण आपले विचार आपल्या साहित्यातून असे उतरायला हवेत की जे सद्याची परिस्थिती बदलू शकतील. इथे रामदास स्वामींचे साहित्य मला प्रकर्शाने आकृष्ठ करते. राजकारणाच्या बाहेर राहून. आदर्श राजकारण करण्यासाठी मार्गदर्शन त्यांनी शिवाजी महाराजांना केले. ते त्यांनी आदरांनी घेतले. हा दुवा सदैव संस्थापित असायला हवा. सुदृढ समाजनिर्मिती साठी राजकारण समाजकारण याप्रति साहित्यिकांची बांधिलकी असली पाहिजे. साहित्यिकानी व्यवस्सयिक होऊ नये. .तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास स्वामी, विवेकानंद, आद्य शंक्रचार्य, यांचे आदर्श घ्यायला हवेत. त्यांचे साहित्य अजरामर झाले. कुसुमाग्रज, ग्रेस, बा भ बोरकार, बहिणाबाई, यांचे साहित्य अजरामर झाले. रामायण, मागभारत, वेद , पुराणे, अभिजात साहित्य बनले. कालातीत झाले. सर्वकालीन झाले. त्यासाठी समर्पण, अभ्यास, निरीक्षण, समाजात मिसळणं. त्यांचं होणं या गोष्टी ओघाने आल्या. तरच त्याची दुःखे, वेदना, असहायता, मजबुरी कळेल. त्यांना या सर्व साहित्यापासून उन्नत होण्याची ऊर्जा मिळाली पाहिजे.
त्यांनी मानसिकता घडविणे आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यावर साहित्यिक ताशेरे ओढणे हे आपले काम आहे. आपली ओळख समाज रक्षक अशी असावी आपला दाब, दबाव राजकारणावर, प्रशासनावर असायला हवा. हा मानसिक आणि वास्तव स्तरावर हवा. आपण साहित्यिक वारकरी आहोत. याची जाण कायम असावी.
साहित्य कसे असावे?
असं काहीस मनापासून लिहवस वाटावं
की जे आतून यावं त्याचे शब्द बनावेत
शब्दावर भाव आरुढ होऊन यावेत
आणि त्याला आपण साहित्य म्हणावं…..
निष्ठुरतेचा निराषेचा तमाचा लवलेशही त्यात नसावा
मायेचा प्रेमाचा आदराचा ओलावा भरगच्च असावा
प्रत्येक शब्दांनी आनंद उत्साह प्रतिध्वनीत व्हावा
जणू सुष्क वृक्षही हरीत पर्णानी बहररुन यावा….
अलवार श्वास कलिकेला मिळून कालिकेचे फुल व्हावे
पांढरे शुभ्र मेघही क्षणार्धात पाण्यानी भरून जावेत
पावसाळी मेघानाही मनापासून चिंभ भिजावेसे वाटावे.
काव्य असे ज्याने नद्या नाल्यानाही प्रेमाचे पूर यावेत….
कविता कशी असावी तर कविता सविता असावी
सविता म्हणजे सूर्य ती सूर्यासारखी प्रकाशमान असावी
संकटाना सामोरे जाण्यासाठी ऊर्जा देणारी असावी
ती फक्त वर्णनात्मक शक्यतो कधीच नसावी….
कविता मनातील आत्मिक भाव भावनाचा हुंकार असावी
तेजोमय, उत्साही आनंदाचा वर्षाव करणारी असावी
निराषेचे, उदविग्नतेचे मळभ दूर करणारी असावी
ती सुगंधित उदाबत्ती असावी मंद तेवणारी समई असावी….
झरन्याचे गुंजन असावी कोकीळची तान असावी
अस्तित्वाचं भान असावी, सामाजिक बांधिलकी असावी
शब्दांना जी अर्थ प्राप्त करून देते ती असते कविता
लिखाणाला ओळख प्राप्त करून देते ती असते कविता….
बालिश अल्लड कुमारीकेची आरमान असते कविता
कवी असणाऱ्या पित्याचा सन्मान असते कविता
काव्य निर्मिणाऱ्या कविमातेचा आशीर्वाद असते कविता
एखाद्या नवकवीचा प्यार दुलार असते कविता…
अश्या साऱ्या कविताना, लिखाणाला, कलागुणांना एकंदरीतच साहित्याला उत्तम व्यासपीठ निर्माण करून देणारी सामाजिक व्यवस्था असावी की जी भक्कमपणे कार्यरत असेल. त्याचा साऱ्या साहित्यिकांना भक्कम असा पाठिंबा वाटेल. सार्थ अभिमान वाटेल. ती व्यवस्था आणि समाजमान सात्विकतेने साहित्याच्या पाठीशी उभे असेल तर सामाजिक प्रबोधन होणे आणखी सोपे होईल. साहित्यिकनी, कवी, लेखक, कथाकार कलावंत यांनी काव्यगूण जपले पाहिजेत. साहित्य गुणाचा प्रसार प्रचार केला पाहिजे. नव साहित्यिकाना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे. ती होणे गरजेचे आहे.
पंढरीचा वरकारी वारी का करतो तर त्याला एका आत्मिक सुखाची, मोक्ष, मुक्तीची अपेक्षा असते. अगदी तशीच सामाजिक बांधिलकी जपण्याची आत्मिक ऊर्जा साहित्यवारी करणाऱ्याचीही असते. साहित्य हे साधन आहे, ही एक साधना आहे आपण सर्व लोक त्या देवतेचे साधक आहोत. काव्यातून आपणाला समजप्रबोधन करायचे आहे. ती आपली बांधिलकी आहे. ती आपण जीवापाड जपली पाहिजे.
साहित्य केवळ वर्णनात्मक नसावं ते सृजनत्मक असावे. समजोपयोगी असावे. मनातील भाव भावना अगदी समर्पक मोजक्या परिपूर्ण अर्थ भरीत व अर्थभारीत शब्दात व्यक्त करणार असावं. जीवनासाठी ही कला आपण जपावी. साहित्य अर्क असावा जीवनातील मूल्यांचा. जीवन जगण्याचा. ते केवळ मनोरंजन शक्यतो नसावे.
कविता ही होईपर्यंत कवीची मुलगी असते. म्हणून ती बनत असताना तिच्यावर संस्कार होणे फार गरजेचे असते. तिचे लग्न होईपर्यंत ती कवीची असते. एकदा का ती प्रकाशित झाली की समजा त्या कवितेचे लग्न झाले. ती समाजाची झाली वाचकांची झाली. नंतर तिच्याविषयीच्या चांगल्या वाईट चर्चा ऐकण्यापलीकडे आपल्या हातात म्हणजेच पितारूपी कवीच्या हातात काही उरत नाही. म्हणून म्हणतो संस्कार पक्के करा. संस्कारक्षम कविता कवीचा आणि समाजाचा दोहोचा उद्धार करते.
एकंदरीताच साहित्य मूल्ये आपण जपू यात तरच आपले नि समाजाचे सात्विक मूल्य वाढेल.
धन्यवाद.
आपलाच,
*पांडुरंग वसंत कुलकर्णी नाशिक*
