You are currently viewing सामंत ट्रस्टतर्फे गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात

सामंत ट्रस्टतर्फे गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात

सामंत ट्रस्टतर्फे गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात

सावंतवाडीतील डॉ. परुळेकर नर्सिंग होममध्ये प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश वितरित

सावंतवाडी :
सावंतवाडी येथील डॉ. परुळेकर नर्सिंग होममध्ये मुंबईस्थित सामंत ट्रस्टच्या वतीने गरजू रुग्ण आणि विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते लाभार्थींना धनादेशांचे वितरण करण्यात आले.

यावेळी सावंतवाडी येथील पांडुरंग नमशी आणि सांताक्रूझ (मुंबई) येथील अल्पिता शेडगे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात आले. तसेच मसुरे येथील रक्ताच्या कर्करोगाने पीडित ओमप्रसाद शेडगे, ओटवणे येथील स्तनाच्या कर्करोगाने पीडित अक्षता जाधव, पेंडूर येथील आतड्यातील रक्तस्त्राव व ॲनिमियाने पीडित भाग्यश्री राऊत, वर्दे येथील पित्ताशयाच्या आजाराने पीडित वासुदेव सावंत, पेंडूर येथील अपस्मार व मानसिक मतिमंदतेने पीडित संजय गावडे, किडनीच्या आजाराने पीडित विद्या ढवळे तसेच नेमळे येथील शस्त्रक्रियेनंतर ग्रॅन्यूलोमा आजाराने पीडित रेश्मा झोरे यांनाही आर्थिक मदत करण्यात आली.

सामंत ट्रस्टच्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना उपचारासाठी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळाला असून, ट्रस्टच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा