You are currently viewing लोकसहभागातून कुडाळ तालुक्यात वनराई बंधारे बांधणार – कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण

लोकसहभागातून कुडाळ तालुक्यात वनराई बंधारे बांधणार – कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण

 

कुडाळ :

 

एकाच वेळी कुडाळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात जास्तीत जास्त बंधारे बांधून मोहीमेच्या शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण व सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी ११ डिसेंबरला होणार आहे. हा शुभारंभ मुख्य कर्मचारी अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग मा. डॉ. हेमंत वसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या मोहिमेमध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकारी अधिकार कर्मचारी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव यांनी केले आहे.

 

गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले की, गाईगुरांना चाऱ्यासाठी आणि वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी पाणी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे असते. सुदैवाने आपल्याकडे पर्जन्यमान उत्तम असल्याने पावसाळ्यात भूजल स्तर पातळी चांगली असते. परंतु आपल्या जमिनीची पाणी धारण क्षमता कमी असल्याने हे पाणी वाहून समुद्राला मिळते. त्यामुळे फेब्रुवारी मार्च महिन्यात पाणी टंचाई निर्माण होते. यावर उपाय म्हणून पाणी अडविणे महत्त्वाचे आहे. लोकसहभागातून वनराई कच्चे बंधारे बांधले जातात. परंतु याला विशेष चळवळीचे स्वरूप देऊन विशेष मोहीम म्हणून राबविल्यास पाणी सिंचनक्षमता वाढू शकेल, असे मत विजय चव्हाण यांनी व्यक्त केले. सन २०१७-१८ मध्ये ३६९, २०१८-१९ मध्ये ७१९, तर २०१९-२० मध्ये ७५३ बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. यावर्षी ही बंधारा दिन साजरा करण्यात येणार असून या मोहिमेत १००० बंधारे बांधण्यात येणार आहे. यात अंगणवाडी कर्मचारी व युवक क्रीडा मंडळे, बचत गट स्वयंसेवी संस्था, विविध कर्मचारी संघटना यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + eighteen =