कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबोली बाजारपेठ येत्या २० सष्टेंबरपर्यंत….

सावंतवाडी प्रातिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबोली बाजारपेठे येत्या दि.२० सष्टेंबरपर्यंत कंटेनमेंट झोन करावी अशी मागणी करण्यात आली आहे.आंबोलीत बाजारवाडी परिसरात दिवसाला चार ते पाच पेशंट मिळत असून यावर प्रशासनाने अजुन कोणतीही कार्यवाही केली नाही ना या परिसरात कंटेनमेंट झोन सुद्धा केला नाही तसेच या परिसरात एक व्यक्ती मयत झाला आहे या संदर्भात प्रशासनाला वारंवार कळविले होते त्या मुळे गावातील ग्रामस्थांनी एकमुखी ठराव घेऊन गावच्या सुरक्षिततेसाठी तसेच ग्रामस्थांच्या हीतासाठी दि.६ ते २० सष्टेंबर पर्यत संपूर्ण बाजारपेठ कंटेनमेंट झोन करावी आणि संपूर्ण आंबोली गांव बंद ठेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळी माजी सरपंच शशिकांत गावडे बाळा पालेकर चेअरमन रामचंद्र गावडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेश गावडे हायस्कूल चेअरमन प्रकाश गावडे धोंडीराम गावडे ऊल्हास गावडे या गाव बैठकीला ऊपस्थित होते.Õ

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − four =