You are currently viewing क्रेडाईच्या गणराया ॲवॉर्डचे वितरण उत्साहात

क्रेडाईच्या गणराया ॲवॉर्डचे वितरण उत्साहात

इचलकरंजी / प्रतिनिधी –

इचलकरंजी क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित गणराया अ‍ॅवॉर्ड 2022 चे वितरण करण्यात आले. विजेत्या सार्वजनिक मंडळांना महानगरपलिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते प्रतिष्ठेच्या गणराया अ‍ॅवॉर्डने गौरवण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट गणेशमूर्ती, उत्कृष्ट कलात्मक गणेशमूर्ती, बालप्रबोधन गणेशमूर्ती, उत्कृष्ट हलता देखावा, उत्कृष्ठ सजीव देखावा, उत्कृष्ठ कलात्मक देखावा, समाज प्रबोधन देखावा, आकर्षक गणेशमूर्ती सजावट आणि शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दरवर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधत क्रेडाई इचलकरंजी आणि बिल्डर असोसिएशन इचलकरंजी यांच्या वतीने गणराया अ‍ॅवॉर्ड प्रदान केले जातात. त्यामध्ये विविध प्रकारात गणेशोत्सव मंडळांना गणराया अ‍ॅवॉर्डने गौरव केला जातो. तर विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांचाही सन्मान केला जातो. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या गणराया अ‍ॅवॉर्ड 2022 साठी इचलकरंजी शहरातील अनेक मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.

त्यामध्ये गांधी चौक गणेशोत्सव मंडळ, धार ग्रुप गणेशोत्सव मंडळ रिंगरोड व बीटीएम बॉईज गणेशोत्सव मंडळ (उत्कृष्ट गणेश मूर्ती). संग्राम चौक गणेशोत्सव मंडळ, महालक्ष्मी सेवाभावी संस्था व जय शिवराय गणेशोत्सव मंडळ विक्रमनगर (उत्कृष्ट कलात्मक गणेश मूर्ती). जय शिवराय गणेशोत्सव मंडळ गावभाग, बाळनगर गणेशोत्सव मंडळ (बाल प्रबोधनात्मक गणेश मूर्ती). दि लक्ष्मी को-ऑप प्रोसेस, गांधी कॅम्प गणेशोत्सव मंडळ व सरस्वती गणेशोत्सव मंडळ आणि सुर्वे मळा गणेशोत्सव मंडळ (उत्कृष्ट हलता देखावा). हिंदुस्थान गणेशोत्सव मंडळ (सजीव देखावा). कलानगर गणेशोत्सव मंडळ (उत्कृष्ठ कलात्मक देखावा). न्यू गणेश तरुण मंडळ लाडाचा गणपती, समर्थ फ्रेंड सर्कल (समाज प्रबोधनात्मक देखावा). जगताप तालीम गणेशोत्सव मंडळ, आण्णा कावतील गणेशोत्सव मंडळ (आकर्षण गणेश मूर्ती सजावट) तर कबनुरचा मनाचा गणेश आणि रवी क्लासेस (शिस्तबद्ध विजर्जन मिरवणूक) या मंडळांना गणराया अ‍ॅवॉर्डने गौरवण्यात आले.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी, इचलकरंजी क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी यांच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल कौतुक करत भविष्यातही असे कार्य घडत राहो, त्यासाठी आपणही सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही दिली.

क्रेडाईचे अध्यक्ष मयूर शहा यांनी स्वागत तर प्रास्ताविक बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन धूत यांनी केले. याप्रसंगी क्रेडार्सचे उपाध्यक्ष जहीर सौदागर, रणजित लायकर, फैय्याज गैबान, शितल काजवे, सम्मेद मगदूम, सय्यद गफारी, पुंडलिक जाधव, भगवान कांबुरे, शिवाजी पवार, फिरोज शिकलगार, पवन डाळ्या, शिवाजी गायकवाड आदींसह क्रेडाई आणि बिल्डर्स असोशिएशनचे सर्व पदाधिकारी, सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा