प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचा स्नेहमेळावा देवगड येथे संपन्न..

प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचा स्नेहमेळावा देवगड येथे संपन्न..

देवगड

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना सिंधुदुर्ग चा स्नेहमेळावा देवगड येथील डायमंड हॉटेल च्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला. पुरोगामी संघटना सिंधुदुर्ग तर्फे ल. रा .जाधव गुरुजी परिवाराच्या सौजन्याने यावर्षीपासून ल. रा. जाधव स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट नेतृत्व पुरस्काराची घोषणा ल. रा .जाधव यांचे चिरंजीव तथा पुरोगामी संघटना सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष श्री सचिन जाधव यांच्यामार्फत करण्यात आली. त्यानी अध्यक्षीय भाषणात ही घोषणा केली .हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातून एका जिल्ह्यात एकाच व्यक्तीला दिला जाणार आहे . पुरस्काराचे स्वरूप शाल सन्मानपत्र व रोख रुपये पाच हजार असे असणार आहे. जाधव गुरुजी यांचे पुरोगामी संघटनेतील योगदान अत्यंत महत्त्वाचे होते . रत्नागिरी जिल्ह्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात संघटना वाढीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुरोगामी संघटना स्थापन व्हावी असे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे.

सद्यस्थितीत रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये शिक्षक पतपेढीवर पुरोगामी संघटनेचे वर्चस्व आहे. अत्यंत धडाडीच्या या नेत्याचे 2016साली दीर्घ आजाराने निधन झाले. महाराष्ट्रभर ते , ल .रा .या दोन अक्षरी नावाने ओळखले जातात. त्यांच्या संघटनात्मक नेतृत्वगुणांचा गौरव व ओळख यासाठी त्यांच्या नावाचा उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार यावर्षीपासून त्यांच्या या जन्मदिनी म्हणजेच 18 मार्च पासून दिला जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा