काश्मीर ते कन्याकुमारी! वेलू पीने उचलला 43 हजार किमी अंतर गाठण्याचा विडा

काश्मीर ते कन्याकुमारी! वेलू पीने उचलला 43 हजार किमी अंतर गाठण्याचा विडा

निश्चय पक्का असेल तर ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. एखादी गोष्ट साध्य करत असतांना मार्गात अनेक अडथळे, संकट येत असतात. मात्र, या संकटांवर मात करत जो पुढे जातो तोच खरा लढवैय्या असतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीची चर्चा रंगली आहे. वेलू पी या लष्करी जवानाने काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर धावत पूर्ण करण्याचा निश्चिय केला आहे. विशेष म्हणजे हे अंतर थोडंथोडकं नसून तब्बल ४३ हजार किलोमीटरचं आहे. सध्या वेलू पी हे त्यांचं ध्येय गाठण्यासाठी मार्गस्थ झाले असून गिनीज वर्ल्ड बूकमध्ये आपल्या विक्रमाची नोंद व्हावी यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा