You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी योगेश कुबल,  विधानसभा मतदार संध कार्याध्यक्ष पदी संदीप पेडणेकर यांची नियुक्ती जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी योगेश कुबल,  विधानसभा मतदार संध कार्याध्यक्ष पदी संदीप पेडणेकर यांची नियुक्ती जाहीर

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा ताकतीने लढवणार – राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत

वेंगुर्ले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी योगेश कुबल यांची आणि विधानसभा मतदार संध कार्याध्यक्ष पदी संदीप पेडणेकर यांची नियुक्ती आज करण्यात आली. दरम्यान यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा ताकतीने लढवणार आहे. या मतदारसंघाचे नेते राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले असले तरी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार पक्षा सोबत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील मतदारांना आश्वासने देऊन फसवणाऱ्या आमदार व विद्यमान मंत्री दीपक केसरकर यांना जनतेसोबत राहून राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जाब विचारतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी वेंगुर्ले येथे बोलताना दिला.

वेंगुर्ले कॅम्प येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज ही निवड प्रक्रिया जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे- परब, प्रांतिक सदस्य श्री. एम. के. गावडे, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. प्रज्ञा परब, सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी, डॉक्टर सेलचे डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा सरचिटणीस श्री. भास्कर परब, वेंगुर्ले शहराध्यक्ष श्री. सत्यवान साटेलकर, महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, बावतीस डिसोजा तसेच श्री. बबन पडवळ, विशाल बागायतकर, श्री स्वप्नील रावळ, श्री. कुणाल बिडये, सिताराम बिडये, वैभव वाडकर, बाबुराव आडेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले की, या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी भक्कम करण्यासाठी पक्षाच्या माद्यमातून बूथ निहाय कार्यकर्त्यांना संघटित केले जाणार आहे. हि विधानसभा निवडणूक पक्ष लढविणार असल्याने अर्चना ताई घारे यांचा मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. हा आमच्या पक्षावर प्रेम करणारा विधानसभा मतदार संघ आहे. नेते स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले. मात्र या मतदार संघासह हा तालुका मागास ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोक कंटाळले आहेत. त्यामुळे येथील आमदाराच्या विरोधात लोकांना न्याय मिळऊन देण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरणार  श्री. सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − nine =