*ज्येष्ठ कवयित्री, चित्रकार, कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जलसौंदर्याविष्कार*
उसळुनि तुषार येता दिसती
त्यात इंद्रधनुचे सप्तरंग,
सूर्य तेजात ते जेंव्हा चमकती
मनमोहवती ते रम्य तरंग.
अद्भुत असे हा निसर्गाचा
नजराणा, मिळे सजीवांस
सृष्टीने निर्मिले चराचरांसाठी
हे सुंदर जीवनदायी बक्षीस.
धुसमुसळे,तोडून बंधसारे
पाषाणांवरुन वाहती प्रपात
कोसळतो मोठाले जलौघ
ओसंडती अवनीवरी वेगात.
खळखळते निर्झर रुणझुणत
मिळती सरितेला गुणगुणत
नागमोडी वाट काढीतधुंद
ही जलदुहिता जाई धावत.
सळसळते रुप तिचे होईआतुर मीलनीफेसाळत्या रत्नाकरास
जीव वेडावे वेगात, न क्षिती उरे
देहभान हरपुनि विसरे स्वतःस.
अथांग उफाळता सागर होई शांत,ते विराट दर्शन जणू भ्रम
सूर्यास्ती स्वर्णबिंब घेई उदरात
स्वर्णरेखांचा चाले नृत्यविभ्रम.
जांभळी सोनेरी किरणे किनारी
ते नयनरम्य दृश्यअसे मनमोहक
समुद्राचे ते रुप अतिविलोभनीय
पहाण्यास येतीअसंख्य पर्यटक.
एकांती सरोवरीफुलतीकमलिनी हिरव्या गडद नीळसरजलाशयी
दिसे शांततेचे प्रतिबिंबित मंदीर
दिसे सभोवार गूढता जलमयी.
चमचम कलाबतुंच्या पडद्यावर
टपटप पाऊस छेडी धुंद तराणे
झरझरधारांतुनि येई मंजुळगाणे
रिमझिमजलथेंबाचे रुप देखणे.
निसर्गाने बहाल केला नजराणा
सजीवांसाठी पाणीअसतेजीवन
जप तू कृतज्ञतेने हा अमोलठेवा
जलसौंदर्याविष्काराने फुले मन.
कवियत्री
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर कलाशिक्षिका
