You are currently viewing फोंडाघाटच्या विकासात मानाचा तुरा; वैश्य समाज पतसंस्थेला “ABP माझा अनमोल रत्न” पुरस्कार

फोंडाघाटच्या विकासात मानाचा तुरा; वैश्य समाज पतसंस्थेला “ABP माझा अनमोल रत्न” पुरस्कार

फोंडाघाटच्या विकासात मानाचा तुरा; वैश्य समाज पतसंस्थेला “ABP माझा अनमोल रत्न” पुरस्कार

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान; अजित नाडकर्णी यांच्याकडून अभिनंदन

फोंडाघाट :

फोंडाघाट गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वैश्य समाज पतसंस्थेला “ABP माझा अनमोल रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री Uday Samant यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या वेळी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, चेअरमन वळंजू तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पावसकर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अग्रेसर असलेली ही पतसंस्था आता जिल्ह्याबाहेरही विस्तारत असून राधानगरी आणि आजरा येथेही शाखा कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे संस्थेच्या कार्याचा गौरव अधिकच वाढला आहे.
या यशाबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य अजित नाडकर्णी यांनी दूरध्वनीद्वारे सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
या पतसंस्थेची मुहूर्तमेढ फोंडाघाट येथे रोवली गेली असून विभागीय कार्यालयही फोंडाघाटमध्येच कार्यरत आहे. त्यामुळे संपूर्ण गावासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा