You are currently viewing लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये मोफत कोरोना लसीकरणाचा खासदार नारायण राणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये मोफत कोरोना लसीकरणाचा खासदार नारायण राणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ

मोफत लसीकरण करणारे लाईफटाईम हे राज्यातील पहिलेच खाजगी हॉस्पिटल; जिल्हाधिकार्‍यांचे गौरवोद्गार

सिंधूदुर्ग
कोरोना प्रतिबंधक लस आता खाजगी रुग्णालयात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ७ खाजगी रुग्णालयांमध्ये यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यात पडवे येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा समावेश आहे. मात्र, या रुग्णालयात मोफत लस देण्याचे रुग्णालय संस्थापक खा नारायण राणे यांनी निश्चित केले आहे. खाजगी रुग्णालयात मोफत लस देण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. या मोफत कोरोना प्रतिबंधक लसिचा शुभारंभ बुधवारी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आला.
कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. तब्बल एक वर्षाच्या अथक परिश्रमाने आता या कोरोनावर लस शोधन्यात संशोधकांना यश आले असून, ही लस पहिल्या टप्यात फ्रंटलाइन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात आली. आता या लशीचा दुसरा टप्पा सुरु झाला असून, आता ही लस 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 ते 59 या वयोगटातील व्याधिग्रस्त व्यक्तींना देण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक ही लस शासकीय रुग्नालयां बरोबरच आता खाजगी रुग्नालयांमधुनाही देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 7 खाजगी रुग्नालयांची निवड यासाठी करण्यात आली आहे. या खाजगी रुग्नालयांमधे ही लस 250 रूपयांमधे देण्यात येणार आहे.
खाजगी रुग्णालयात ही लस विकत घ्यावी लागणार हे निच्छित असतानाच पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज चे संस्थापक भाजपा नेते खा नारायण राणे यांनी मात्र आपल्या रुग्णालयात कोरोना लस मोफत देण्याचे निच्छित केले आहे. बुधबारी या कोरोनाप्रतिबंधक मोफत लस देण्याचा आणि कोरोना प्रतिबंधक लस कक्षाचा शुभारंभ खा नारायण राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, लाईफ टाईम हॉस्पिटल च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ अपूर्वा पड़ते, डीन डॉ दरेकर, डॉ. आर एस कुळकर्णी, सौ संध्या तेरसे, दादा साईल, मिलिंद मेस्त्री आदि उपस्थित होते. शुभारंभ प्रसंगी डॉ आर एस कुलकर्णी आणि डॉ दरेकर यांनी ही लस घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =