You are currently viewing कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदी डाॅ.संजय भावे यांची निवड

कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदी डाॅ.संजय भावे यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे मानाचे पद – अजित नाडकर्णी

कणकवली

कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदी डाॅ.संजय भावे यांची निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे मानाचे पद देण्यात आले आहे.
डाॅ.संजय भावे हे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचे बंधुराज स्व.हेमंत नाडकर्णी यांच्या मित्र परीवारातील आहेत. डॉक्टर संजय भावे हे दापोलीला नोकरीला असले तरी त्यांचे घर कणकवलीत आहे. त्यांच्या अथक परिश्रमानेच त्यांना हे अत्युच्च पद प्राप्त झाले आहे. डाॅ.संजय भावे यांचे भाऊ श्री. भावे यांनी सुद्धा सार्वजनीक बांधकाम विभागात अत्य्युच्च पद स्विकारुन रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये रस्ता, ब्रिज यांची मोठमोठी कामे करुन नावलौकीक मिळवुन रिटायर्ड झाले.
कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदी नियुक्त झालेले डाॅ.संजय भावे हे कुलगुरु पदाला नक्कीच न्याय देतील असा विश्वास अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केला. लवकरच त्यांची भेट घेवुन त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा