You are currently viewing विनामास्क फिरणाऱ्या 125 जणांवर दंडात्मक कारवाई

विनामास्क फिरणाऱ्या 125 जणांवर दंडात्मक कारवाई

सिंधुदुर्गनगरी 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 125 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

       यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 8 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 1 हजार 600  रुपयांचा दंड वसूल केला असून,  पोलिसांनी 78 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 32 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर नगर पालिका क्षेत्रामध्ये 39 व्यक्ती विनामास्क आढळून आल्या असून त्यांच्याकडून एकूण 9 हजार  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही 42 हजार 700 रुपये इतकी आहे.

       त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 115 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 4 ठिकाणी कोवीडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

       कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरीकांनी कोवीडच्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 13 =