You are currently viewing आई

आई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम गझल*

 

*आई*

वृत्त : अनलज्वाला

 

प्रेमळ, त्यागी अन कष्टाळू असते आई

वत्सल छाया कुटुंबावरी धरते आई

 

कुणा कुणाच्या सेवेमध्ये मग्न सदोदित

पलीकडे त्या कुणालाच ना दिसते आई

 

थोर किती ही देवी, माता गौरव मोठा

वरवरच्या या ‘किताबात मग फसते आई

 

धन संपत्ती वरती केवळ नाव पित्याचे

तिथे कुठे मग दस्तऐवजी नसते आई

 

मदर्स डे ला आठवून तिज डोळा पाणी

त्या नंतर मग फोटोपुरती उरते आई

 

श्रीनिवास गडकरी

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा