You are currently viewing महाराष्ट्र राज्य काजू मंडळ गठित विशेष समिति सभा संपन्न

महाराष्ट्र राज्य काजू मंडळ गठित विशेष समिति सभा संपन्न

सिंधुदुर्गनगरी :

कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी, काजू उद्योगाला लागणारे खेळते भांडवल, दर्जेदार कच्चा मालाचा अनियमित पुरवठा इत्यादी समस्यांबाबत काजूमंडळाने एक सर्व समावेशक योजना (comprehensive scheme) तयार करणे करता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे माननीय संचालक श्री मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची पहिली सभा शुक्रवार दिनांक ०८/०५/२०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्ग येथील बँकेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली.

या सभेवेळी समिती सचिव काजू बोर्ड तथा उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, श्री मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उपस्थित श्री संजय कदम कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, श्री विनायक कोकरे सर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, डॉक्टर परशुराम पाटील समिती सदस्य, श्री.यादव समिती सदस्य, श्री.रुपेश बेलोसे समिती सदस्य, श्री. महेंद्र पवार सहाय्यक सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य काजू मंडळ मुख्यालय पुणे तसेच श्री तुळशीदास रावराणे बाजार समिती सभापती तथा सदस्य संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, श्रीम. नाईकनवरे मॅडम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग, श्री सुनील मरबळ प्र. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग, श्री. श्रीपाद दामले महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग श्री. क्षीरसागर फळ संशोधन केंद्र शास्त्रज्ञ, तसेच शेतकरी व प्रक्रियादार प्रतिनिधिचे स्वागत मा अध्यक्ष श्री मनीष दळवी यांचे हस्ते करण्यात आले.

या सभेवेळी उपस्थित शेतकरी व प्रक्रियादार यांचे कडून त्यांना उद्भवणाऱ्या प्रोसेसिंग, मार्केटिंग, निर्यात, आर्थिक बाबी अशा समस्याबाबत जाणून घेण्यात आले आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यात येऊ शकतात याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काजू उत्पादन वाढवणे, उत्पादित काजू बी खरेदी व साठवण करण्यासाठी विकास सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ यांच्या माध्यमातून गोदाम उभारणी करणे, कारखानदारांना प्रक्रिया करण्यासाठी काजू बी चा पुरवठा करणे, कोकणातील काजूला जीआय मानांकन दृष्टीने शेतकऱ्यांची नोंदणी करणे, ब्रँड विकसित करणे , काजू बोंडूवर प्रक्रिया उद्योगासाठी चालना देणे, या सारख्या अनेक विषयांवर या सभेमध्ये चर्चा झाली असून याबाबतच्या शिफारशी शासनाकडे सादर करण्याचे निश्चित करण्यात आले.

कार्यकारी संचालक श्री. संजय कदम यांनी काजू मंडळाची उ्दिष्टे तसेच सभेतील विषयांबाबत आपल मत मांडले व शेतकरी व प्रक्रिया दार यांनी मांडलेल्या अडचणी समस्या यावर आपले मत व्यक्त केले.

या सभेचे अध्यक्ष श्री मनीष दळवी यांनी सर्व शेतकरी व प्रक्रियादार यांच्या अडचणी त्यावर करावयाचे उपाय तसेच शेतकरी व प्रक्रियादार यांनी सुचविलेल्या काही महत्त्वपूर्ण सूचना याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

समिती सचिव श्री. मिलिंद जोशी यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी शेतकरी प्रक्रियादार यांचे सभेसाठी उपस्थित राहिल्या बद्दल आभार व्यक्त केले व सभेची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा