आचरा ग्रामपंचायत कडून बचतगटाला मोफत हळदीचे वाटप

आचरा ग्रामपंचायत कडून बचतगटाला मोफत हळदीचे वाटप

हळद लागवड प्रात्यक्षिकाचेही आयोजन

मालवण

बचतगटांना शेतीतून उन्नती साधता यावी यासाठी आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला बालकल्याण निधी मधून आचरा गावातील महिला बचत गटांना 500kg हळदीचे मोफत वाटप करण्यात आले. उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेलम जातीच्या हळद लागवडीचे प्रात्यक्षिक जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस आणि आचरा सरपंच प्रणया टेमकर यांच्या उपस्थित भंडारवाडी येथे घेण्यात आले.
यावेळी त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर, वृषाली आचरेकर, कृषी सहाय्यक एम आर खराडे बचतगटाच्या वैशाली आचरेकर, दीप्ती नाईक, रोहिणी पांगे, धनश्री टेमकर, स्वप्नाली मुणगेकर, सुप्रिया गांवकर, नीता नाईक,सरिता मुणगेकर, शुभांगी मोरवेकर, महादवी मुणगेकर, स्वप्नाली मुणगेकर, मेघा गोगटे,आदी महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा