You are currently viewing आमदार प्रमोद जठार यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीत जोरदार तयारी
Oplus_16908288

आमदार प्रमोद जठार यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीत जोरदार तयारी

कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे विशाल परब यांचे आवाहन

सावंतवाडी :

विधान परिषदेवर नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचा उद्या भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते विशाल परब यांनी केले आहे.

प्रमोद जठार यांच्या निवडीनंतरचा हा सिंधुदुर्गातील पहिलाच दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा तसेच सावंतवाडी भाजपच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा