You are currently viewing स्व.सुदनजी बांदिवडेकर यांचा स्मृतीदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

स्व.सुदनजी बांदिवडेकर यांचा स्मृतीदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

स्व.सुदनजी बांदिवडेकर यांचा स्मृतीदिन १५सप्टेंबर करोना गो दिन म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी फोंडाघाट आरोग्य केंद्रात रुग्णाना फळवाटप, पाणी बाॅटल वाटप, बिस्कीट सॅनीटाईझर मास्क यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सभापती मनोज राणे, उपसभापती श्री पारकर, श्री कानडे, तालुका अध्यक्ष अजित नाडकर्णी, आण्णा तेंडुलकर, सरपंच उप सरपंच राजनजी चिके, सुदनचा मुलगा साहील बांदिवडेकर, अनीलशेट बांदिवडेकर, बबनशेट पवार, नेरुरकर, बाळाशेट भोगले, राजु पावस्कर, उत्तम रेवडेकर, चौलकर भाऊ मुंबईचे मित्र बाबा राणे हे उपस्थित होते.

पांडव ग्रुप अजित नाडकर्णी यांचे मार्फत १०० पाणी बाॅटल्स, पार्ले बिस्कीट, मास्क, सॅनीटायझर कॅन, वाटप करण्यात आले. डाॅ.जंगम आणि सर्व स्टाफचे सहकार्य लाभले. स्व सुदनच्या घरी जावुन फोटोला पुष्पहार घालुन आदरांजली वाहाण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा