You are currently viewing राज्यस्तरीय ऑनलाईन बालचित्रकला स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या प्रिया देसाईचे यश…

राज्यस्तरीय ऑनलाईन बालचित्रकला स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या प्रिया देसाईचे यश…

सावंतवाडी

शिक्षक ध्येय आयोजित बालचित्रकला राज्यस्तरीय स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलची विदयार्थिनी कु.प्रिया प्रदीप देसाई हिने यश मिळवले या निवडीसाठी तिला २०२२ या वर्षातील बालचित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते. त्याचप्रमाणे तिने मिळवलेल्या यशासाठी प्राथमिक शिक्षकांच्या वतीने तिला टॅब देऊन गौरविण्यात आले. तिला यासाठी अस्मसा अकॅडमीचे चित्रकला शिक्षक श्री. अक्षय सावंत व श्री. विवेक मल्हार तसेच तिचे वडील समग्र शिक्षा अभियानचे विषय तज्ञ श्री. प्रदीप गणपत देसाई व तिची आई प्राथमिक शिक्षिका सौ. प्रांजल प्रदीप देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, उपमुख्याध्यापिका सि. मेबल करवालो, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिने प्राप्त केलेल्या यशासाठी तिचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =