You are currently viewing या शतकाचा आदर्श ठरला

या शतकाचा आदर्श ठरला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*या शतकाचा आदर्श ठरला*

 

भविष्य वाचतो बाळ उद्याचे

औचित्य साधून पुस्तक दिनाचे

अक्षर गुटी तो घेऊन जन्मला

महत्व जाणले ज्ञान ग्रहणाचे

 

नऊ महिन्यांचे घेऊन शिक्षण

*कृष्ण भूल* ती पडून गेली

गिरवत होता धडा रोज एक

*माते उदरी* सवय जहाली

 

अभिमन्यू तो सावध झाला

अभ्यासोनी म्हणून प्रगटला

नका घालू कुणी बोट तोंडात

“या शतकाचा आदर्श ठरला”

 

देणार धक्के अजून तुम्हाला

सवड आपण द्यावी तयाला

ही तर आहे सुरूवात छोटी

नमस्कार करा या मारूतीला

 

जन्म दिनाचे वाचून भविष्य

ठरवणार आहे आपले लक्ष

संगणक युगाची महती भारी

म्हणून शोधतोय लायक पक्ष

 

विनायक जोशी✒️ ठाणे

प्रतिक्रिया व्यक्त करा