You are currently viewing वैभववाडी नुतन उपसभापती अरविंद रावराणे यांचे विनोद तावडेंनी केले अभिनंदन…

वैभववाडी नुतन उपसभापती अरविंद रावराणे यांचे विनोद तावडेंनी केले अभिनंदन…

वैभववाडी

पंचायत समितीचे नूतन उपसभापती अरविंद रावराणे यांचा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थित जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, हुसेन लांजेकर, बाळा हरयाण व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकतीच वैभववाडी पंचायत समिती च्या उपसभापतीपदी भाजपाचे अरविंद रावराणे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. शुक्रवारी वैभववाडी दौऱ्यावर आलेले माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा