You are currently viewing मनसेतर्फे मालवणात  मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा

मनसेतर्फे मालवणात  मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा

शाळा,महाविद्यालयात प्राध्यापक,शिक्षकांना गुलाबपुष्प देवून केले सन्मानित

मालवण शहरातील व्यापारीवर्गाला शुभेच्छारुपी व व्यवहारात मराठीचा आग्रह करणारी वाटली पत्रके

तारकर्लीत सुंदर हस्ताक्षर व निबंध स्पर्धेचेही आयोजन

मराठी कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती निमित्त व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून  मालवणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यावतीने आज मालवण शहरातील विविध शाळा,महाविद्यालयात मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

तसेच मालवण मध्ये सर्व अनेक दुकानधारकांना व व्यापाऱ्यांना राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे व व्यवहारात जास्तीत जास्त मराठी वापरण्यास सांगणाऱ्या आशयाचे पत्रके वाटण्यात आली मालवण मनसेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व शिक्षक, व्यापारी तसेच मालवणवासीयांकडुन कौतुक होत आहे.

यावेळी  मनविसे विभाग अध्यक्ष देवबाग प्रतिक कुबल,साईराज चव्हाण मनविसे शहराध्यक्ष  मालवण,अमेय सुर्वे मनसे उपविभाग अध्यक्ष हडी- मसुरे,शाखाध्यक्ष तारकर्ली प्रसाद बापर्डेकर, विभाग अध्यक्ष देवबागचे बजरंग कुबल, शाखाध्यक्ष तारकर्ली मनमोहन केळुसकर आदी यावेळी उपस्थित  होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − nine =