*खासदार नारायण राणे यांच्या जन्मदिवसानिमित्त आलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची फसव्या आश्वासनासह सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोल भेट.*
*मुंबई गोवा महामार्गाचे काम वीस वर्षे झाली तरी अद्याप अपूर्णच मात्र सरकार टोलच्या धाडीसाठी तत्पर-मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा आरोप.*
सिंधुदुर्ग
गेल्या अनेक वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या नावाखाली दिवा स्वप्नेच दाखवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एखाद्या प्रकल्पामार्फत सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना फायदा अथवा रोजगार उपलब्ध झालेला नाही. यामध्ये विमानतळाचा प्रकल्प, मायनिंगचे प्रकल्प व कुडाळ एमआयडीसी या सारखे अनेक प्रकल्प, प्रत्येक वेळी आमच्या तोंडाला पाणीच पुसण्याचे काम सुरू आहे. यामध्ये भर म्हणून खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग मे महिन्यात पूर्ण करण्याचे पुन्हा एकदा फसवे आश्वासन दिले. सिंधुदुर्ग मध्ये येऊन मालवणी आस्वाद घेत दिल्लीला गेल्यावर मात्र सिंधुदुर्गच्या जनतेला टोल धाडीची भेटवस्तू पाठवून देण्याचे काम मात्र अति तत्परतेने केले.
गेली 20 वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग येत्या मे महिन्यात पूर्ण होण्याची सुताराम देखील शक्यता नसताना ही टोल धाड नेमकी कोणाच्या फायद्यासाठी आहे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर करावे असे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले आहे.
