You are currently viewing न्याय न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात विष प्राशन करून करणार आत्महत्या…

न्याय न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात विष प्राशन करून करणार आत्महत्या…

साळेल गावचे माजी सरपंच उदय गावडे यांचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा

ओरोस

मालवण तालुक्यातील साळेल येथील शिवकालीन पाणी साठवण योजने अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई होत नसल्याने आपल्याला त्रास होत आहे. पुढील एक महिन्यात न्याय न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयातच विषप्राशन करून आत्महत्या करणार असल्याचा इशारा साळेल गावचे माजी सरपंच उदय गावडे यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना लेखी निवेदनद्वारे दिला आहे.

मालवण तालुक्यातील साळेल येथे शिवकालीन शेततळी दाखवून ८ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याबाबत योग्य त्या पुराव्यासह मालवण पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी दोन वेळा उपोषण करण्यात आले आहे. २६ जानेवारी २०२१ रोजी मालवण पंचायत समितीसमोर ठेवण्यात आलेल्या उपोषणादरम्यान गटविकास अधिकारी यांनी याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाची जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी होणार आहे. दरम्यान या चौकशी पूर्वीचा आपल्याला धमक्या दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे विविध मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. ज्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्या संबंधितांपासून आपल्या सह आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे गावडे यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. तसेच एक महिन्यात न्याय न मिळाल्यास आपण ग्रामपंचायत कार्यालयात विष पिउन आत्महत्या करणार आहे. आणि याला प्रशासन आणि संबंधित जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 3 =