You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या साबण रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा केंद्रशाळेच्या साबण रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा

जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं 1शाळेतील विद्यार्थ्यांनी बांदा गावातून काढलेल्या साबण गोळा करावयाच्या रॅलीला उत्स्फूर्त मिळाला.
जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हात धुण्याचे फायदे,हात धुण्याच्या पध्दती स्वच्छ तेचे महत्व समजावून सांगितले. जिल्हातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या या शाळेत मोठ्या प्रमाणात हात धुण्यासाठी साबण व हँडवॉश याची मोठ्या प्रमाणात गरज असते यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी साबण गोळा करणेसाठी रॅली आयोजित केली होती.


लक्षात ठेवा ,लक्षात ठेवा जेवणापूर्वी हात धुवा अशा प्रकारच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी बांदा बाजारपेठेतून प्रभात फेरी काढली.या प्रभात फेरीला बांदा येथील व्यापारी व नागरीकांनी प्रतिसाद देत विद्यार्थ्यांकडे स्वेच्छेने विविध पृरकायचे स्वच्छतेचे साहित्य सुपूर्द केले. सदर उपक्रम यशस्वी करणेसाठी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा