You are currently viewing कोल्हापूर येथून मालवणला येत असलेली रिक्षा चौके येथे पलटी

कोल्हापूर येथून मालवणला येत असलेली रिक्षा चौके येथे पलटी

अपघातात एक गंभीर तर तीन प्रवासी जखमी

मालवण

कोल्हापूर येथून मालवणकडे येणारी भरधाव रिक्षा चौके भराडी मंदिर पासून काही अंतरावर साळेलच्या दिशेला रस्त्यावर पलटी होऊन सोमवारी सकाळी अपघात घडला. रिक्षातील एक प्रवासी गंभीर जखमी झाला तर तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. यातील एका प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिकांनी धाव घेत अधिक उपचारासाठी १०८ ने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

कोल्हापूर वरून मालवणला पर्यटनासाठी रिक्षा (MH09EL1009) घेऊन मालवणच्या दिशेने येत असताना अपघात घडला.
स्थानिक ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिका बोलावून जखमीना जिल्हा रूग्णालयामध्ये पाठविण्याची व्यवस्था केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − three =