सिंधुदुर्गातील जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मालवण संघ विजेता; नितीन स्पोर्ट्स म्हापण उपविजेता

सिंधुदुर्गातील जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मालवण संघ विजेता; नितीन स्पोर्ट्स म्हापण उपविजेता

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मालवण संघाने नितीन स्पोर्ट्स म्हापण संघाचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. सिंधुदुर्ग जिल्हा हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एस. एस. स्पोर्ट्स व एस. के. क्लब पाट यांच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत मालवण, सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ले, देवबाग, म्हापण, पाट, फोंडाघाट असे आठ संघ सहभागी झाले होते.

पहिला उपांत्य फेरीचा सामना वेंगुर्ला विरुद्ध नितीन स्पोर्ट्स म्हापण यांच्यात झाला. यात नितीन स्पोर्ट्स संघाने विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात मालवण संघाने सावंतवाडी संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात मालवण संघाने सरळ दोन सेटमध्ये नितीन स्पोर्ट्स संघाचा पराभव करत विजेतेपद पटकाविले.

सामन्यात मालवण संघाच्या आदिल शेखने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. स्पर्धेत मालवण संघाची कामगिरी सर्वोत्तम राहिली. स्पर्धेत बेस्ट लिफ्टर म्हणून ओंकार पाटकर (मालवण), बेस्ट अ‍ॅटॅकर म्हणून कौस्तुभ वायंगणकर (म्हापण), बेस्ट लिबेरो म्हणून अ‍ॅलेक्स फर्नांडिस (वेंगुर्ले) यांची निवड करण्यात आली. मालवण संघाला मार्गदर्शक म्हणून शोएब शेख, अमित हर्डीकर यांनी काम पाहिले. टीम ओनर स्वीटन सोज, फ्रान्सिस फर्नांडिस उपस्थित होते. स्पर्धेसाठी कुणाल सरमळकर यांचेही सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा