उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर जिल्हा युवक राष्ट्रवादीच्यावतीने रक्तदान शिबिर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर जिल्हा युवक राष्ट्रवादीच्यावतीने रक्तदान शिबिर

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना च्या पार्श्वभूमीचा विचार करता रक्ताचा अपुरा पुरवठा लक्षात घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांच्या पुढाकारातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज  22 जुलैला रक्तदान शिबिर रोप वाटप अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

राज्यातील रक्ताची मागणी वाढत असल्याने आणि रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन राज्य सरकारने व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी सामाजिक बांधिलकी जपत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवसनिमित्त ह्या समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून समाजासाठी योगदान द्यावे असे आव्हान युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा