You are currently viewing शिवजयंती सोहळा साजरा केल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींसह ४०० जणांवर गुन्हा

शिवजयंती सोहळा साजरा केल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींसह ४०० जणांवर गुन्हा

राज्यासह देशभरात शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवभक्तांमध्ये कमालीचा उत्साह असला तरी कोरोनाचं सावट असल्याने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्याने शिवभक्तांसह भाजप, मनसे व इतर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अनेक ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करणारच असा निर्धार व्यक्त केला गेला होता. तर, शिवजयंतीच्या कार्यक्रमाला १०० हुन अधिक जमाव करू नयेत असे स्पष्ट आदेश गृह विभागाने जारी केले होते. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींसह ४०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सूत्रांमार्फत समोर येत आहे.

शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील कुटासा गावातील ही घटना आहे.

शिवजयंती उत्सव @शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी

दरवर्षी शिवजन्मस्थळ शिवनेरीवर महाराष्ट्र सरकारतर्फे शासकीय शिवजयंती साजरी केली जाते. यासाठी खुद्द मुख्यमंत्री देखील या स्थळी दाखल होत असतात. कोरोनाचं सावट हे कायम असल्याने हा सोहळा साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला गेला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आदींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव व पालखीचा सोहळा पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − one =