You are currently viewing मडूरा तिठा येथून मोटरसायकल चोरीस

मडूरा तिठा येथून मोटरसायकल चोरीस

बांदा
मडूरा तिठा येथील नाईक अॉटोमोबाईल्समध्ये दुरुस्तीकरिता ठेवलेली बॉक्सर ऐटी मोटरसायकल (एमएच ०७ ई १२९१) अज्ञात चोरट्याने पळवून नेली आहे. तशी फिर्याद बांदा पोलीसात दाखल करण्यात आली आहे. गॅरेज मालक दिनेश नाईक यांच्या वडिलांचे निधन झाल्याने गॅरेज बंद होते. ही संधी साधून गॅरेज बाहेर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. सदर क्रमांकाची मोटरसायकल कोठेही आढळल्यास बांदा पोलीस (०२३६३ -२७०२३३) किंवा दिनेश नाईक (९४२११४५३१४) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा