You are currently viewing गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त ज्येष्ठांचा सत्कार

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त ज्येष्ठांचा सत्कार

सावंतवाडी

उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ इन्सुली डोबाचीशेळ येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून  नूतन माधमिक विद्यालय इन्सुली मध्ये शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  तसेंच गावातील शालेय मुलांना शेक्षणिक साहित्याचे वाटप तसेंच सरकारी कामातून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी इन्सुली विद्या विकास मंडळ हायस्कुल भाजपचे माजी तालुका अध्यक्ष श्री उमेश पेडणेकर, इन्सुली सहकारी सोसायटी चे चेअरमान गुरूनाथ पेडणेकर, मंडळचे अध्यक्ष महेंद्र सावंत,  इन्सुली ग्रामपंचायत चे सदस्य स्वागत नाटेकर,  वर्षा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − sixteen =