You are currently viewing शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात….

शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात….

*आ. वैभव नाईक यांची उपस्थिती*

मालवण :

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने  किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्सव कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी किल्ले परिसरात ढोल ताशाच्या गजरात , छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मूर्तीस आ.वैभव नाईक यांनी जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून  दर्शन घेतले.

सिंधुदुर्ग किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव असलेले हे शिवराजेश्वर मंदिर शिवजयंती निमित्त आकर्षक फुलांची आरास करून सजविण्यात आले होते. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी किल्ले परिसर शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख  बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, विजय पालव, सेजल परब, दीपा शिंदे, पूनम चव्हाण  श्वेता सावंत, दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, शिल्पा खोत, भाई कासवकर सन्मेष परब, कमलाकर गावडे, यशवंत गावकर, अमित भोगले, राहुल सावंत, पॉली  गिरकर, देवा रेवडेकर, दर्शन म्हाडगुत, महेंद्र म्हाडगूत, उमेश मांजरेकर, पंकज सादये, अमोल वस्त,भाऊ परब, राजू नार्वेकर,श्री रेवडेकर, तपस्वी मयेकर,किसन  मांजरेकर, किल्ले होडी प्रवाशी संघटनेचे स्वप्नील आचरेकर, मंगेश सावंत, राजू पराडकर, बाळा तारी,  आदींसह शिवसैनिक  उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =