You are currently viewing जिल्हा परिषद शाळांना वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रक तात्काळ देण्याची मागणी…

जिल्हा परिषद शाळांना वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रक तात्काळ देण्याची मागणी…

ओरोस

जिल्हा परिषद शाळा वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रक तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. याबाबतची मागणी जिल्हाध्यक्ष नितीन कदम व सचिन मदने यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षाकरिता जि प शाळांना द्यावयाच्या वार्षिक सुट्टयांची यादी प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग यांची दिनांक 06/05/2020 रोजी बैठक घेऊन निश्चित केली होती. परंतु कोवीड 19 प्रादुर्भाव आपत्कालीन परिस्थितीचे कारण दाखवून सदरचे परिपत्रक निर्गमित होऊ शकले नव्हते. शासनाच्या निर्देशाप्रमाणे २७ जानेवारी २०२१ पासून इ ५ वी ते ८ वीचे वर्ग नियमितपणे सुरू करण्यात आले असून इ १ ली ते ४ थी चे वर्ग नजीकच्या काळात सुरू होण्याचे सूतोवाच करण्यात आलेले आहे त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ उर्वरित शालेय दिवसांमध्ये शाळांना द्यावयाच्या किरकोळ सुट्टया या अधिकृतरित्या कळणे आवश्यक आहे. किरकोळ सुट्टयांचे परिपत्रक शाळांना जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत याबाबत विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे.त्यामुळे सदर परिपत्रक शाळांना तात्काळ निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा