You are currently viewing ही सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील : राजेंद्र म्हापसेकर

ही सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील : राजेंद्र म्हापसेकर

फेंड्स सर्कल खोक्रल चा “दिपावली शो टाईम” उत्साहात संपन्न

दोडामार्ग

गेली २२ वर्षे खोक्रल सारख्या दुर्गम गावात दिपावली शो टाईम सारखा कार्यक्रम आयोजित करून गावात सांस्कृतिक चळवळ राबवणाऱ्या फेंड्स सर्कल खोक्रल चे करावे तेवढे कौतुक कमीच असून ही सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करण्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन माजी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी खोक्रल येथे केले. ते खोक्रल येथे फ्रेंड्स सर्कल आयोजित दिपावली शो टाईम कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

फेंड्स सर्कल खोक्रल हे मंडळ गेली २२ वर्षे हा दिपावली निमित्त खास दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करते. यंदा तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी लहान मुलांचे कार्यक्रम, स्पर्धा तसेच श्री सिद्धेश्वर दशावतार बाल नाट्य मंडळ खोक्रल यांचा दशावतार नाट्य प्रयोग पार पडला. दुसऱ्या दिवशी वैभवी क्रियेशन डिचोली यांचे विनोदी नाटक अग्गबाई सुनबाई संपन्न झाले तर तिसऱ्या दिवशी रांगोळी,फेन्सी ड्रेस स्पर्धा, किल्ले बनवणे स्पर्धा, आदी कार्यक्रम पार पडले.

*पहा DSN ची खास बातमी 👉👉*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Watsapp for any Computer/Laptop related Problem & Antivirus : 9765446118*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉
यावेळी व्यासपीठावर माजी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जिल्हा बॅंक संचालक प्रकाश गवस, खोक्रल गावचे पोलिस पाटील श्री विलास भाई शेटकर, खोक्रल सरपंच श्री.देवेंद्र शेटकर, उपसरपंच श्री गोपाळ नाईक, तसेच एड. सोनू गवस,,भारत माता की जय संघटनेचे श्रीगणेश गावडे,प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता गणेश ठाकूर आदी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *DSN च्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा हजारो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क 👉 9021494368*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*-असंख्य लोकांना सोशल मीडियावर अपडेट ठेवणारा डिजिटल न्यूजपेपर 🎯 DSN🎯 नक्की जॉईन करा*_ 👉https://www.facebook.com/District-Sindhudurg-News-192890054826033/
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
*जाहिरातीसाठी संपर्क: प्रमोद गवस ; मोबा.९७६५४४६११८*
*फेसबुक पेज:* https://www.facebook.com/District-Sindhudurg-News-192890054826033/ *युट्युब चॅनल* https://youtube.com/channel/UCxjK9KeBl4EdRANF149OxTA *Daily Hunt वर DSN……*
http://dhunt.in/cqYbk?s=a&uu=0xe7c30b86c8bb5f1a&ss=pd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇

https://kutumbapp.page.link/VY35C923rPQBUzw6A?ref=3C00C

प्रतिक्रिया व्यक्त करा